माणसांपेक्षा एआय जास्त बुद्धिमान होणार, मस्क यांचा खळबळजनक दावा

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा बोलबाला प्रचंड वाढला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांत एआयने उडी मारली आहे. त्यामुळे जगातील मोठ्या कंपन्या एआयवर आपला फोकस करत आहेत. 2026 पर्यंत एआय कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक इंटेलिजन्ट आणि बुद्धिमान होईल, असा खळबळजनक दावा टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी केला आहे. पुढील पाच वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत एआय संपूर्ण जगातील सर्व व्यक्तींहून अधिक समजदार आणि स्मार्ट होईल, असेही मस्क या वेळी म्हणाले.

मस्क यांनी केलेली ही भविष्यवाणी केवळ एक अंदाज नव्हे, तर एआयमध्ये लागोपाठ विकास होत आहे. गेल्या काही वर्षांत एआयमुळे टेक्नोलॉजीने प्रत्येक क्षेत्रात क्रांती आणली आहे. आगामी काही वर्षांत एआय व्यक्ती जो विचार करतो, त्याच्यापेक्षा जास्त विचार एआय करू शकेल, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. एआयमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. जगातील मोठ्या टेक कंपन्या एआय मॉडल बनवत आहेत. तसेच एक दुसऱ्याला मागे टाकण्यासाठी चढाओढ लागली आहे. मस्क यांच्या भविष्यवाणीकडे एजेंटिक एआय आणि फिजिकल एआय होत आहे. त्यामुळेच यात क्रांतिकारक बदल मानले जात आहेत. आधुनिक एआय मॉडल हे इतके पुढे गेले आहे की, काही नॉन फिजिकल कार्यात व्यक्तींपेक्षा जास्त कामगिरी एआय करत आहे, असे गुगलचे चिफ सायटिंस्ट जेफ डीन यांनी म्हटले आहे. 2020 मध्ये मस्क यांनी म्हटले होते की, एआय पाच वर्षांत माणसांपेक्षा सरस कामगिरी करेल.