
युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून मुंबईतील विधानसभानिहाय विभाग युवा अधिकारी, उपविभाग युवा अधिकारी, विधानसभा समन्वयक, विधानसभा चिटणीस, शाखा युवा अधिकारी व उपशाखा युवा अधिकारी या पदांकरिता रविवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुलाखती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
बोरिवली विधानसभेकरिता शाखा क्र. 16, वजीरा नाका, बोरिवली पश्चिम येथे तर चारकोप विधानसभेकरिता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बोरा कॉलनी, कांदिवली पश्चिम येथे मुलाखती होतील. कांदिवली पूर्व विधानसभेकरिता शाखा क्र. 29, वडारपाडा, कांदिवली पूर्व येथे तर भायखळा विधानसभेकरिता शाखा क्र. 210, लवलेन, भायखळा येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. मलबार हिल विधानसभेकरिता शाखा क्र. 214, एम.पी. मिल कंपाऊंड, ताडदेव येथे तर मुंबादेवी विधानसभेकरिता शाखा क्र. 216, कामाठीपुरा, मुंबादेवी येथे मुलाखती घेण्यात येतील.
युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.