शिवरायांचे नाव बदलून कर्नाटकात मेट्रो स्टेशनला सेंट मेरी नाव

कर्नाटकातील मेट्रो स्टेशनला देण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलून सेंट मेरी असे करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापुढे ठेवला आणि त्यांनीही त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वृत्त आहे. यावरून आता शिवप्रेमींसह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या आठवडय़ात बंगळुरूतील सेंट मेरी बॅसिलिका येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात शिवाजी नगर मेट्रो स्टेशनला सेंट मेरी असे नाव देण्याची मागणी करण्यात आली. त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सहमती दर्शवली. काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद हे शिवाजी नगर मतदारसंघातूनच निवडून आले आहेत. मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याबाबत आपण केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.