किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान

आजकाल DIY चा युग सुरू आहे. फिटनेसपासून ते ब्युटी इंडस्ट्रीपर्यंत, लोक महागड्या क्रीम आणि महागड्या डाएट प्लॅनकडे तसेच घरगुती उपायांकडे धावत आहेत. यामुळे नैसर्गिक गोष्टी लावून त्वचेची काळजी घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. आता असे बरेच लोक आहेत जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रासायनिक सौंदर्यप्रसाधनांऐवजी स्वयंपाकघरात मिळणाऱ्या वस्तू वापरण्यास प्राधान्य देतात.

Skin Care – ऋतूनुसार तुमच्यासाठी कोणते फेशियल योग्य आहे? वाचा

नैसर्गिक गोष्टी त्वचेसाठी सुरक्षित आहेत. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही नैसर्गिक गोष्टी थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेलाही नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये ठेवलेल्या त्या पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही कधीही थेट चेहऱ्यावर लावू नयेत.

लिंबू:
लिंबात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी किंवा डाग कमी करण्यासाठी वापरतात. पण लिंबू खूप आंबट आहे आणि ते आम्लयुक्त देखील आहे. अशा परिस्थितीत थेट लिंबू त्वचेला लावल्याने त्वचेचे संतुलन बिघडू शकते. ते त्वचेवर लावल्याने लालसरपणा, खरुज, कोरडेपणा किंवा ऍलर्जी होऊ शकते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी ते आणखी धोकादायक आहे. तुम्हाला लिंबू वापरायचे असेल तर ते थेट लावू नका, तर फेस मास्क किंवा स्क्रबमध्ये काही थेंब घाला.

साखर:
लोक घरी स्क्रब बनवण्यासाठी अनेकदा पांढऱ्या साखरेचा वापर करतात. परंतु साखरेचा खरखरीतपणा त्वचेला दुखापत करू शकतात. अशा परिस्थितीत, ते जळजळ, सूज, कोरडेपणा आणि लालसरपणा निर्माण करू शकते. ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुमे आहेत त्यांनी साखरेचे स्क्रब अजिबात वापरू नये, कारण ते डाग आणि सूज वाढवू शकते.

गोड खाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाॅलो करा ‘या’ साध्या सोप्या टिप्स

बेकिंग सोडा:
बेकिंग सोडा ही स्वयंपाकघरात वापरली जाणारी एक सामान्य गोष्ट आहे. परंतु चेहऱ्यासाठी मात्र ही घातक आहे. बेकिंग सोडा चेहऱ्यावर थेट लावल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. यामुळे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात. मुरुमे वाढतात आणि त्वचा संवेदनशील बनते.

दालचिनी:
दालचिनी हा एक मसाला आहे, परंतु यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. दालचिनी लावताना नेहमी मध किंवा ऑलिव्ह ऑइल सारख्या गोष्टींमध्ये मिसळा.

वनस्पती तेल:
काही लोक स्वयंपाकघरातील वनस्पती तेल मॉइश्चरायझर म्हणून वापरतात. ते छिद्रे बंद करू शकते, ज्यामुळे त्वचेवर मुरुमे येऊ शकतात आणि त्वचेला नुकसान होऊ शकते. रिफाइंडमध्ये रसायने देखील असू शकतात.