Russia earthquake – शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला; 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला आहे. रशियाच्या पूर्वेकडील कामचटका भागात 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या शक्तिशाली भूकंपानंतर रशियातील किनारी भागातील शहरांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

युनायटेड स्टेट्‍स जिओलॉजिकल सर्व्हेने रशियातील कामचटका बेटाजवळ 7.1 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली. जमिनीखाली 39.5 किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला आहे. यामुळे रशियातील किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या प्रचंड लाटा धडकण्याची शक्यता आहे. पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने याबाबत इशारा दिला असून किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

याआधी जुलैच्या सुरुवातीलाही कामचटका बेटांजवळ शक्तिशाली भूकंप झाला होता. यामुळे पॅसिपिक महासमुद्रामध्ये 12 फूट उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. हवाई ते जपानपर्यंत किनारी भागांवर या अजस्त्र लाटांचा तडाखा बसला होता. यात काही प्रमाणात वित्तहानी झाली होती, मात्र जीवितहानी टळली होती.

दरम्यान, जपानमध्ये 2011 मध्ये जगातील सर्वात प्रलयकारी भूकंप झाला होता. त्यावेळी 9.9 रिश्टल स्केलची नोंद करण्यात आली होती. या भूकंपामुळे त्सुनामीचा तडाखा बसून 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली होती.