
टीम इंडिया व पाकिस्तानमधला आशिया कपमधील सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याला संपूर्ण देशभरातून विरोध होत असताना बीसीसीआय व केंद्र सरकार मात्र हा सामना खेळवण्यावर अडून बसले होते. मात्र याचा परिणाम स्टेडियममध्ये दिसला. या सामन्यादरम्यान दुबईचे स्टेडियम अर्ध्याहून अधिक रिकामं असल्याचे समोर आले आहे.
हिंदुस्थान पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामना जाहीर होताच त्याची तिकीटं अवघ्या काही मिनिटांत हातोहात विकली जातात. मात्र आजच्या सामन्याची हजारो तिकीटे सामना सुरू होण्यापूर्वी पर्यंत शिल्लक होती. त्याचा परिणाम स्टेडियममध्येही दिसला. स्टेडियम अर्धे रिकामे असल्याचे दिसून आले.
मागच्या वेळी विक्रीचा धडाका
यूएई अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीत याच सामन्याची तिकिटे फक्त चार मिनिटांत संपली होती. त्या दिवशी दोन वेळा तिकिट खिडकी उघडावी लागली होती. पण यावेळी ती क्रेझ गायब झालीय. सोशल मीडियावर चाहत्यांनीही निराशा व्यक्त केली आहे.