
घरातील रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये बऱयाच वेळा बर्फाचा डोंगर साचतो. असे होऊ नये म्हणून काय करावे? फ्रीजचे तापमान योग्य सेट करा. फ्रीजच्या मागील बाजूस एक पाइप आहे जो पाण्याचा निचरा करण्याचे काम करतो. जर ते थांबले तर बर्फ अधिक गोठण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता करत राहा.
फ्रीज वारंवार उघडल्याने आत उबदार हवा येते, जी थंड हवेमध्ये मिसळून आर्द्रता निर्माण करते आणि नंतर त्याचे बर्फात रूपांतर होते, त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच फ्रीज उघडा. फ्रीजच्या मागील बाजूस कॉइल पंडेन्सर आहे. यामुळे फ्रीज थंड होतो. ते घाण झाल्यावर फ्रीज नीट काम करू शकत नाही. ते साफ करत राहा.