
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे पॅनल का घुसवले, याबाबत सविसेतर माहिती देत मोठा दावा केला. तसेच राज्यात ठाकरे हा एकच ब्रँड असून तो कोणीही संपवू शकत नाही, असे ठणकावले. मोदी यांनी आता स्वतःच्या नियमाप्रमाणे पद सोडत केदारनाथ गुहेत ध्यानधारणा करावी, देशाला अवतारी पुरुष मिळेल, असा टोलाही हाणला.
देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष शिवसेनेबाबत बोलले आहेत. त्यांचे मुंबई अध्यक्ष असेही म्हणाले की, शिवसेनेला मुंबईच्या महापौरपदी एखादा खान बसवायचा आहे. मात्र, अब्दुल कलाम यांना राषट्रपती कोणी केले? अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यापाल कोणी केले? अशी अनेक उदाहरणे देता येतील. देशाच्या राजकीय, सामाजिक जडणघडणीमध्ये किंवा स्वातंत्र्यलढ्यात भाजप नव्हता किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ नव्हता. मात्र, देशाच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाज होता. फडणवीस यांनी हमीद दलवाई, युसुफ मेहेरअली, अरुणा असफअली, असफाकउल्ला खान, सिंकदर बख्त यांचा त्यांनी अभ्यास करावा, फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही. फडणवीस हे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात चिकटवलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांना खानांचा एवढा तिटकारा असेल तर फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि तो शिवसेनेचाच होईल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची खूप चिंता आहे. मात्र, ती चिंता नसून ती भीती आहे. मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखालील बिल्डरांनी ताब्यात घेतली आहे. मुंबईचे लोढाकरण आणि कंबोजीकरण कसे झाले आहे, ते प्रसारमाध्यमांनी जनतेसमोर आणले पाहिजे. मुंबईतील सर्व एसआरए प्रकल्प फडणवीस यांच्या जवळच्याच बिल्डरांनी कसे मिळत आह, याबाबत वर्षा गायकवाड यांनी परखडपणे मत भाषणात मांडले आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत कधी शशांक राव तर कधी शिवसेना पॅनलचा विजय होत असतो. आता तिथे फडणवीस यांनी त्यांचा गट घुसवला. त्यांनी यावेळी तिथे गट का घुसवला? याचा कोणी विचार केला आहे काय? आगामी काळात बेस्ट बंद पाडायची आणि बेस्ट डेपोचा जी जागा आहे, तिथे त्यांच्या लाडक्या बिल्डरद्वारे रिडेव्हलपमेंट करायची, असा त्यांचा डाव आहे. प्रसाद लाड हेदेखील बिल्डर आहेत. बेस्ट डेपोच्या रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्या लाडक्या बिल्डरांना घुसवता यावे, यासाठी कामगारांच्या पतपेढीवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी पाच पाच हजार रुपये देत मते विकत घेतली. तब्बल 1800 मते अवैध ठरवण्यात आली. त्यातील बहुसंख्य मते शिवसेनेच्या पॅनलला मिळाली आहेत. एक हजार मते अपक्षांना मिळाली आहेत.अपक्ष देखील यांच्याच पैशांवर उभे करण्यात आले, फक्त मराठी माणसाची संघटना असेलल्या शिवसेनेच्या पॅनलचा पराभव व्हावा आणि भविष्यात बस डेपो लाडक्या बिल्डरच्या घशात घालता यावे, यासाठी भाजप आणि त्यांची बिल्डर लॉबी या पतपेढीच्या निवडणुकीत उतरली, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांना बेस्ट बंद पाडायची असून त्यांनी डेपोचे वाटपाही केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका,तुमची सगळी अंडीपल्ली बाहेर काढू. या चिल्लरपिल्लर बिल्डर लॉबीला घत ते राज्य करत आहेत. त्यांनी मुंबई अमराठी बिल्डरांना विकली आहे म्हणूनच त्यांना ठाकरे ब्रँड नको आहे, असे ते म्हणाले. मिंधे हे ब्रँड वैगरे नाही, त्या ब्रँडीच्या छोट्याछोट्या बाटल्या आहेत. त्यांना नशाही नाही. ब्रँडी आधी औषध म्हणून घ्यायचे, त्यांची ब्रँडी विष आहे महाराष्ट्रासाठी असेही ते म्हणाले. राज्यात ठाकरे हा एकच ब्रँड आहे.
देवेंद्व फडणवीस यांची जाहिरातबाजी आणि कॅम्पेनवर 50 ते 55 कोटी खर्च झाल्याचा आकडा आपण दिला होता. आता आलेल्या नवीन आकडेवारीनुसार 150 ते 175 कोटी या जाहिरातबाजीवर खर्च झाले आहेत. त्यांनी जाहिरतबाजी कोठे करतोय, याचेही भान नाही, अनेक ठिकाणी मुतारी आणि शौचालये इथेही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटे लावले आहेत. त्याबाबत जनतेतूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही जाहिरातबाजी काळ्या पैशांचा खेळ आहे. या काळ्या पैशांची चौकशी तपाय यंत्रणा करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासेहब ठाकरे यांचा ब्रँड संपवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बाळासाहेब यांचा ब्रँड महाराष्ट्रातून संपवता येणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर, स्थानिक आघाड्यांवर आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकावर ठरत असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी विवध आघाड्या निर्माण होऊ शकतात, असेही ते म्हणाले.
वयाच्या 75 नंतर पद सोडावे, हा नियम मोदी यांनीच केला आहे. लालकृषण आडवणी आणि इतर नेत्यांनाही त्यांनी याच नियमाने दूर केले. आता हा नियम मी सोडून इतरांनी पाळावा, असे ते म्हणत असतील तर ते अयोग्य आहे. आता त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. आता त्यांच्या स्वतःच्या नियमानुसार त्यांनी पद सोडावे आणि केदारनाथ गुहेत जात ध्यानधारणा, तप करावे म्हणजे देशाला अवतारी पुरुष मिळेल, असा टोलाही त्यांनी हाणला.