
कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपायावर आरोपीने सुऱयाने हल्ला केल्याची संतापजनक घटना अँटॉप हिल परिसरात घडली. या हल्ल्यात समाधान माने हे जखमी झाले. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. समाधान माने हे अँटॉप हिल पोलीस ठाण्यात काम करतात. शुक्रवारी रात्री ते गस्त करत होते. तडीपार केलेले गुन्हेगार पुन्हा परिसरात आले नाही ना याची ते शहनिशा करत होते. तेव्हा तेथे मोहमद पीर आला. त्याने माने याच्याशी हुज्जत घातली. त्याना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सुऱ्याने पोटात वार करण्याचा प्रयत्न केला.
हल्ला चुकवल्याने त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. माने याने पीरला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने माने याना धक्का मारून पळ काढला. या घटनेची माहिती समजताच अँटॉप हिल पोलीस घटनास्थळी आले. माने याच्यावर उपचार करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीच्या अटकेसाठी शोध मोहीम हाती घेतली आहे.