सरकार मायबाप तात्काळ मदत करा, बेलगाव येथील शेतकऱ्याचा आक्रोश

अतिवृष्टीमुळे सर्वत्रच पाणीच पाणी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास जाणार तसेच आलेल्या पिकाचे संपूर्णत: नुकसान झाल्यामुळे येणारे वर्ष कसे काढायचे हा घोर शेतकऱ्याला लागल्यामुळे गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील जगन्नाथ रामकिसन राऊत या शेतकऱ्याने कृषी मंत्री दत्ता भरणे यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या नसता शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा आक्रोश केला आहे.

तालुक्यात ढगफुटी झाल्याने शेतकऱयांच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. उभी पिके पाण्यामध्ये दिसत असल्यामुळे बेलगाव येथील शेतकरी जगन्नाथ रामकिसन राऊत यांनी आम्ही उदरनिर्वाह भागवायचा कसा तसेच शेतामधील सोयाबीन आणि तुर पीक हे पाण्याखाली गेले त्यामुळे हे वर्ष काढायचे कसे असा आक्रोश बेलगाव येथील शेतकऱ्यांनी केला असून तात्काळ मदत कराकी अशी मागणीच शेतकऱयांनी कृषीमंत्री दत्ता भरणे यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. तात्काळ मदत करा नसता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा आक्रोश देखील या व्हिडिओमध्ये शेतकऱयांनी केला आहे तरी तात्काळ शासनाने मदत कराकी अशी मागणी देखील गेकराई तालुक्यातील शेतकऱयांकडून होत आहे.

कृषी अधिकाऱयासमोर शेतकऱयाचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाक येथील शेतकरी सुभाष पडीले यांनी अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही म्हणून कृषी अधिकारी कार्यालयातच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. हे शेतकरी निवेदन घेऊन तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालयात गेले असता अधिकारी उपस्थित नव्हते. किनगाव मंडळाचे अधिकारी यांनी शेतकऱयांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. यामुळे सुभाष पडीले या तरुण शेतकऱयाने अंगावरील सदऱ्याच्या सहाय्याने फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

एनडीआरएफ, सैन्याच्या टीम मदतीसाठी दाखल

भूम, परंडा तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ तसेच सैन्यदलाची तुकडी दाखल झाली आहे. सुमारे दीडशे नागरिकांना परंडा येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.