मुंबईत सरासरीपार पाऊस! साडेतीन महिन्यांत 105 टक्के नोंद

मुंबईत या वर्षी दमदार पाऊस झाला असून आतापर्यंत 105 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत 2200 मिमी पाऊस होतो. हवामान विभागाच्या नोंदीनुसार आतापर्यंत कुलाबा केंद्र येथे 2095 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 99 टक्क्यांवर पाणीसाठा जमा झाला आहे.

उपनगरांत धुवांधार

मुंबईत आज पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडला. यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसामुळे वाहतूककोंडी झाल्याने मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली. तसेच काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.