अतिवृष्टीच्या पाहणीसाठी अंबादास दानवे बीडमध्ये, शेतकर्‍यांशी साधला संवाद

बीड जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टी भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते अंबादास दानवे आज बीडमध्ये दाखल झाले. त्यांनी मंजरी, चौसळा भागाची पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांना धीर देत पंचनामे नको. सरसकट आणि तात्काळ मदत द्या, असे आवाहन राज्य सरकारला केले.

बीड जिल्ह्याची पूरपरिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला आहे. पाच लाख हेक्टरवरील खरिप भुईसपाट झाला आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आज बीडमध्ये आले. त्यांनी तालुक्यातील मंजरी आणि चौसाळा भागाची पाहणी केली. शेतकर्‍यांशीही संवाद साधला. संकट मोठे आहे. धीर धरा, शिवसेना तुमच्या पाठिशी असल्याचा शब्द दिला. यावेळी सरकारला आवाहन करताना अंबादास दानवे म्हणाले की, पंचनामे कशाचे करताय, काही शिल्लकच राहिले नाही. शेतकर्‍यांना सरसकट आणि तात्काळ मदत द्या असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, ज्येष्ठ शिवसैनिक विलास महाराज शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मिराताई नवले, जिल्हा समन्वयक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ महुवाले, सुशिल पिंगळे, तालुकाप्रमुख गोरख सिंगण, रतन गुजर, नवनाथ प्रभाळे, रवि वाघमारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.