नेट-सेट परीक्षेसाठी नवे नेव्हिगेटर

नेट आणि सेटची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी अश्वराज अकादमीने नवीन पुस्तक बाजारात आणले आहे. अश्विनी जाधव-पडदरे लिखित ‘नेट-सेट नेव्हिगेट’ असे या पुस्तकाचे नाव असून ते नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

प्राध्यापक होण्यासाठी नेट आणि सेट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नेट-सेट परीक्षेसाठी बाजारात असंख्य पुस्तके आधीच उपलब्ध आहेत, परंतु त्या पुस्तकामध्ये काय वाचावे, हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना नेहमी संभ्रम होतो. त्यामुळे ही पुस्तके अत्यंत वेळखाऊ ठरतात. या सर्व पुस्तकांना अपवाद म्हणजे ‘नेट-सेट नेव्हिगेट’ हे नवीन पुस्तक आहे. या पुस्तकाचे खास वैशिष्टय़े म्हणजे यात संक्षिप्त व आवश्यक माहिती, माइंड मॅप्स, नमुना प्रश्नसंच अशा सर्वांची सुटसुटीत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खरेदी करावे, असे आवाहन अश्वराज अकादमीने केले आहे. ‘नेट-सेट नेव्हिगेट’ पुस्तक हवे असल्यास 9372820296 या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करा, असे आवाहन अकादमीकडून करण्यात आले आहे.