
अवैधपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशींवर जोगेश्वरी पोलिसांनी कारवाई केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी सलीम मोलल्ला, नतृ शेख, रुकसाना शेखला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. यामध्ये परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक इकबाल शिकलगार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक चारू भारती, दत्तात्रय लांडगे, उपनिरीक्षक विजय ढवळे, संजीव लांडगे, खुंटे, पिसाळ आदीच्या पथकाने तपास करताना सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली.