
सततच्या पावसाने पिके तर गेलीच शिवाय मांजरा नदीच्या बाजूला असलेल्या आठ एकर पिकांसह शेतजमीनही वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आला. यामुळे केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकर्याने शेतात विजेला स्पर्श करून जीवन संपवले.
कर्जमाफीची मागणी लावून धरणार, सरकारकडून कामे करून घेणार; उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर
रमेश ज्ञानोबा गव्हाणे (६२) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. सततच्या पावसाने शेतातील सोयाबीन कुजून गेले. शिवाय मांजरा नदीच्या पाण्याने नदीकाठची उत्पन्न देणारी जमीन वाहून गेली. यामुळे आता पुढे काय करायचे? या विचारात असलेल्या केज तालुक्यातील बोरगाव बु.येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे (६२) यांनी शेतात असलेल्या विद्युत प्रवाहाला स्पर्श करीत मंगळवारी दुपारी जीवन संपवले. त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयातून अंबाजोगाई रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अंबाजोगाई रुग्णालयात बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले आणि बोरगाव येथे दुपारी अंत्यविधी करण्यात आला.






























































