
भारत संचार निगम लिमिटेडच्या 4जी सेवेचा शुभारंभ शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. ओडिशाच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी झारसुगुडा येथून बीएसएनएलच्या 25 व्या वर्धापन दिनी 97,500 हून अधिक मोबाइल टॉवरचे उद्घाटन केले. 4 जी सेवेचा देशातील 9 कोटी यूजर्सला फायदा मिळेल. सध्या स्वीडन, डेन्मार्क, चीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे स्वदेशी 4जी टेक्नोलॉजी आहे. हिंदुस्थान आता या देशांच्या यादीत सहभागी झाला आहे.