राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या विद्यार्थी संघटनेचे (ABVP) माजी नेते प्रिंटू महादेव यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू’, असं ते म्हणाले होते. याच प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी न्यूज१८ केरळ वाहिनीवर लडाख हिंसाचारावरील चर्चेदरम्यान हे वादग्रस्त विधान प्रिंटू महादेव यांनी यांनी केलं होतं. प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि म्हटले की त्यांना ‘राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू’.

दरम्यान, या वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस नेते सदस्य रमेश चेन्नीथला यांनी केरळ पोलिसांनी प्रिंटू महादेव यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.