IND Vs WI – वेगवान गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर, कारण आलं समोर

Asia Cup 2025 चं विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. 2 ऑक्टोबर पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजच्या अडचणींमध्ये वाढ करणारी बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ मालिकेतून बाहेर पडला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली असून, अल्झारी जोसेफच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. जोसेफने तशी माहिती बोर्डाला दिली होती, तो दुखापतीतून सावरला असला तरी, अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याला मालिकेतून वगळण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्याच्या जागी जेडिया ब्लेड्सचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. यापूर्वी शमार जोसेफ सुद्धा संघातून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिज संघाचे दोन तगडे वेगवान गोलंदाज बाहेर पडल्यामुळे संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आणि दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.