अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला बेड्या

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी एकाला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी ही वांद्रे परिसरात राहते. त्याच परिसरात आरोपी राहतो. नुकतेच ती मुलगी जात होती तेव्हा अटक आरोपी तिला भेटला. त्याने तिचा हात पकडून धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्या कृत्यानंतर त्याने मुलीला धमकी दिली. मुलीने याची माहिती आईला दिली. त्यानंतर निर्मल नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.