
पेन्शनच्या नावाखाली वृद्ध महिलेची फसवणूकप्रकरणी एकाला बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. आशीष तिवारी असे त्याचे नाव असून तो खासगी कंपनीत काम करतो. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याने दोन वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीची पॉलिसी विकत घेतली होती. त्याचा पहिला हप्ता महिलेने भरला होता.
दुसरा हप्ता भरण्यासाठी त्याने फोन केला तेव्हा महिलेने पॉलिसी बंद करून पैसे परत करण्यास त्याला सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला पॉलिसीचा बोनस आहे. पॉलिसीची व्हॅल्यू वाढली असल्याचे भासवले. तुम्ही पॉलिसीची रक्कम भरल्यास पेन्शन सुरू होईल असे महिलेला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने 7 लाख 94 पाठवले. ती रक्कम जमा केल्यावर त्याने तिची पॉलिसीची रक्कम बँक खात्यात वर्ग करू असे महिलेला सांगितले होते. पॉलिसीबाबत महिलेने तिच्या मुलीला माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी त्या कार्यालयात जाऊन चौकशी केली तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला.