
रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथे कोजागिरीच्या रात्री घरफोडी झाली आहे. या घरफोडीत तब्बल 15 तोळे सोने आणि 40 हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हसीना अन्वर काझी (राहणार छत्रपती नगर साळवी स्टॉप रत्नागिरी) यांच्या घरी ही चोरी झाली आहे.
घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. काझी यांच्या शेजारी राहणाऱ्याने सकाळी साडेसातच्या सुमारास सांगितले दोन्ही बाजूचे दरवाजे बाहेरून कडी लावून बंद करण्यात आले होते. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ दाखल झाले असून फॉरेनसीक ची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.