ट्रम्प यांचे टॅरिफ अमेरिकेवरच झाले बुमरँग; जनतेला मोठा फटका, अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे आता विपरीत परिणाम दिसत आहे. ट्रम्प यांचे टॅरिफ अस्त्र आता अमेरिकेवरच बुमरँग झाले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे विपरीत परिणाम आता दिसत आहे. अमेरिकेवरच कर आकारणीचा मोठा परिणाम होत आहे. अमेरिकन जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आकारणीचा परिणाम केवळ इतर देशांवरच नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) माजी मुख्य अर्थतज्ज्ञांनी टॅरिफ अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी ट्रम्प यांच्या कर आकारणीवर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर २५% तर हिंदुस्थान आणि ब्राझीलसारख्या देशांवर ५०% टॅरिफ आकारले आहे. मात्र, त्यांचा हा निर्णय अमेरिकेसाठीच अडचणीचा ठरत आहे. जगभरातील अनेक आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनी त्यावर टीका केली आहे.

माजी आयएमएफ मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनीही यावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की अमेरिकेने सहा महिन्यांच्या आयात शुल्कानंतरही कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम झालेला नाही आणि अमेरिकेतील वाढलेला महसूल अमेरिकन जनता आणि स्थानिक कंपन्यांकडून मिळवला आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्कामुळे जागतिक स्तरावर व्यापार युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग ती चीनसोबत असो किंवा ब्राझीलसारख्या देशांसोबत. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर प्रथम २५% आयात शुल्क जाहीर केले आणि नंतर रशियन तेल खरेदीचा हवाला देऊन ते ५०% पर्यंत दुप्पट केले. पण जगभरातील देशांवर आयात शुल्क लादून अमेरिकेने काय साध्य केले? असा सवालही त्यांनी केला आहे.

हार्वर्ड विद्यापीठातील भारतीय वंशाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापक गीता गोपीनाथ यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरच नकारात्मक परिणाम झाला आहे. गीता गोपीनाथ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क जाहीर करून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्यांचे कोणतेही महत्त्वपूर्ण परिणाम झालेले नाहीत. अमेरिकेच्या शुल्कामुळे काय साध्य झाले? त्यांनी सरकारी महसूल वाढवला का? हो, त्यांनी लक्षणीयरीत्या केले, परंतु हे पैसे जवळजवळ पूर्णपणे अमेरिकन कंपन्यांकडून गोळा केले गेले आणि अंशतः अमेरिकन ग्राहकांनी भरपाई केली, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माजी आयएमएफ मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी शुल्कांवर टीका केली आणि म्हटले की ते अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी थेट नकारात्मक स्कोअरकार्ड आहेत. हिंदुस्थानआणि ब्राझीलमधून आयातीवर ५०% पर्यंत आणि काही भारतीय औषधांवर १००% पर्यंत शुल्क, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि व्यापार संतुलन सुधारण्यासाठी होते. परंतु त्यांचा अमेरिकेला फारसा किंवा कोणताही आर्थिक फायदा झाला नाही. व्यापार संतुलनात सुधारणा किंवा अमेरिकन उत्पादन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

टॅरिफमुळे अमेरिकेतील महागाई वाढली आहे. महागाई दराबाबत गीता गोपीनाथ म्हणाल्या की त्यांच्या अंमलबजावणीपासून देशात महागाईत थोडीशी वाढ झाली आहे. विशेषतः, घरगुती उपकरणे, फर्निचर आणि कॉफीच्या किमती वाढल्या आहेत. केवळ गोपीनाथच नाही तर जगभरातील अनेक तज्ज्ञांनीही ट्रम्पच्या शुल्कांवर आपापल्या पद्धतीने टीका केली आहे आणि त्यांना अमेरिकेसाठीच धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले आहे.