
बुऱ्हाणनगर (ता.नगर) येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता मंगळवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भक्तिपूर्ण वातावरण झाली. कोजागिरी पौर्णिमेच्या आल्हाददायक चंद्रप्रकाशात काढण्यात आलेली तुळजाभवानी दिवेची छबिना मिरवणूक रंगली. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरचे पुजारी भगत परिवाराच्या वतीने पारंपरिक पद्धतीने वाजंत्रीच्या तालात छबिना मिरवणूक काढली. यावेळी जगदंबा देवीच्या जयजयकारात कुंकवाची उधळण करण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत, दुर्गा भगत व अंबिका साळुंके यांनी देवीची महाआरती तसेच देवीच्या पलंगाच्या प्रतिकृतीची पूजा केली.
मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या छबिना मिरवणूकीत भगत परिवाराच्या सदस्यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी मंदिरात असलेल्या पलंगाची प्रतिकृती खांद्यावर घेत हातात भगवे ध्वज, अबकारी व मशाल घेत वाजत गाजत मंदिरा भवती देवीचा जयजयकार करत प्रदक्षिणा करण्यात आली. या मिरवणुकीनंतर भंडारा महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. मिरवणुकीत देवीचे गोंधळी, तृतीयपंथी तसेच भाविक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंदिराचे पुजारी अॅड.अभिषेक भगत म्हणाले, बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात यावर्षी मोठ्या भक्तिभावाने नवरात्रोत्सव साजरा झाला. दसऱ्याच्या दिवसापासून श्रमनिद्रेत असलेल्या दिवेला कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा सिंहासनास्थ करण्यात आले. देवीची महापूजा व सायंकाळी महाआरती करून छबिना मिरवणूक काढण्याची पुरातन काळापासूनची परंपरा आहे. ही परंपरा भगत परिवार जपत आहे. भाविकांनी आई जगदंबेची सेवा कायम करत रहावे. जे भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला देवीच्या दर्शनास जाऊ शकत नाही त्यांनी आपला कुलाचार बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात येतात. यावेळी राजेंद्र भगत, कुणाल भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कविता भगत, ऋषिकेश भगत, अॅड.अजिंक्य भगत, अंकिता भगत, अॅड.संकेत भगत, अॅड.रोहन भगत,अक्षदा भगत, शिवानी भगत क्षताक्षी व वेद भगत आदींसह भाविक उपस्थित होते.