Health Tips – शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणता काढा घ्यावा? जाणुन घ्या

बदलत्या हवामानाचा मोठ्यांसह लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्यावर परिणाम होतो. थंड वारा, धूळ आणि विषाणूजन्य संसर्ग आपल्याला सहज आजारी पाडू शकतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.  ज्यामुळे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या सामान्य समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात.

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशी काढा सर्वात प्रभावी मानला जातो. तुळशीची पाने उकळून तयार केलेला काढा घसा खवखवणे शांत करतो, सर्दी आणि विषाणूजन्य संसर्गापासून शरीराचे रक्षण करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. या काढामध्ये सितोपलादी चूर्ण घालणे आणखी फायदेशीर आहे.

तुळस आणि सितोपलादी काढा बनवण्यासाठी –

1 कप पाणी, तुळशीची पाने, सितोपलादी चूर्ण, आल्याचा तुकडा, लवंग, आणि काळी मिरी, गुळ एकत्र पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा, नंतर गाळून घ्या आणि गरम गरम प्या.

 

हळदीचे पाणी की हळदीचे दूध यातील कोणते सर्वात उत्तम, जाणून घ्या

 

तुळशी आणि सितोपलादी चूर्णाचे फायदे

  • तुळशी आणि सितोपलादी चूर्ण केवळ मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर नाही तर इतर अनेक आरोग्य समस्यांमध्ये देखील मदत करते.
  • तुळशीचा काढा घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी यापासून आराम देतो.
  • सितोपलादी चूर्ण कफ पातळ करते, श्वसनमार्ग साफ करते आणि फुफ्फुसांना स्वच्छ करण्यास मदत करते.
  • हा काढा दिवसातून 1 ते 2 वेळा कोमट पाण्यात द्यावा. सितोपलादी चूर्ण तुळशीच्या काढामध्ये मिसळून लहान मुलांना दिल्याने मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
  • मुलांचे शरीर आतून निरोगी राहते आणि ऋतू बदलताना आजारांशी लढण्याची त्यांची क्षमता वाढते.

 

शेंगदाणे आणि मखाना एकत्र खाल्ल्याने आरोग्यास काय फायदे होतात, वाचा

 

  • या गोष्टी लक्षात ठेवा

काढा आणि पावडर देण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घ्या.

मुलांना हा काढा जास्त प्रमाणात देऊ नका.

गर्भवती महिलांनी काढा पिण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गंभीर आजार किंवा सतत खोकला/ताप असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.