
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जाहिरातबाजीवरून मिंधे गटाला फटकारले आहे.
” मला सर्वजण विचारतात की पुढचा कार्यक्रम काय. तर खरं हिंदुत्व देशभक्ती काय आहे ते सर्वांना समजून सांगण्याची गरज आहे हाच पुढचा कार्यक्रम आहे. काही जणांच्या डोळ्यावर पट्ट्या आहेत. आता येताना तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण परिसर होर्डिंग बॅनरने बरबटून टाकलाय. ब्रिटनचे पंतप्रधान आलेले आणि स्वागत कोण करतंय आपले उपमुख्यमंत्री. तिथपर्यंत पोहोचले तरी आहेत का हे ? त्या बॅनरकडे बघितलं की असं वाटतं की ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मिंधे सेनेत प्रवेश केलाय. अशी सगळी धुळफेक सुरू आहे. स्वत:ची जाहीरातबाजी, बॅनरबाजीचं वेडं लागलंय. सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या प्रसिद्धिचं वेड लागलंय. काम केलं तर लोकं स्वत:हून तुम्हाला दाद देतात व तुमचं कौतुक करतात”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.