
आपल्या शरीरासाठी विविध घटकांची गरज असते. त्यातील एक म्हणजे मासे. मासे खाण्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ती प्रोटीन्स मिळत असतात. ब्रेन स्ट्रोक सारख्या आजारांवर मासे खाणे हे खूप गरजेचे मानले गेले आहे.
सध्याच्या घडीला ब्रेन स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे सर्व होण्यामागे आपला आहार हा कारणीभूत आहे. एका संशोधनात्मक अभ्यासात असे आढळून आले की जे लोक जास्त मासे खातात त्यांना स्ट्रोकची लक्षणे कमी होती, तर दुसर्या अभ्यासात असे आढळून आले की माशांच्या सेवनाने रक्तवहिन्यासंबंधी मेंदूचे नुकसान होण्याची जोखीम लक्षणीयरीत्या कमी होती. तुम्ही आठवड्यातून दोन दिवसही मासे खाल्ले तर तुम्ही ब्रेन स्ट्रोकचा धोका टाळू शकता.
चेहऱ्याचे सौंदर्य खिलवण्यासाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा
आहारातील योग्य बदल आणि प्रत्येक गोष्टींचं योग्य नियोजन केल्यास आपल्याला निरोगी राहण्यास नक्कीच मदत होईल. आपल्या आहारात मासे समाविष्ट करणे हे खूप लाभदायक मानले गेले आहे. आहारात मासे समाविष्ट केल्याने, ब्रेन स्ट्रोकचा धोकाही फार मोठ्या प्रमाणात कमी होतो. माशांमध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप हितावह आहे हे आता सिद्ध झालेले आहे. पॅरालिसिसचा धोका कमी होण्यासाठी आठवड्यातून दोनदा मासे खाणे हे खूप गरजेचे मानले जाते.
मासे हे आपल्या आरोग्यासाठी का चांगले आहेत हे जाणून घेऊया
स्तनदा मातांसाठी बाळांच्या निरोगी दृष्टीसाठी मासे खाणे हे खूपच हितावह आहे. मुख्य म्हणजे सुरमई, बांगडा यासारखे मासे हे ओमेगा-३ फॅटी अॅसिडसह समृद्ध असतात. त्यामुळे आपल्या त्वचेसाठीही उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करतात.
मासे जखमा बरे करण्यास, न्यूरोप्रोटेक्शन आणि हेपॅटोप्रोटेक्शनमध्ये मदत करू शकतात
मासे खाण्यामुळे आपल्याला चांगली झोप लागण्यासही मदत होते.
पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा
मासे नियमित सेवन केल्यामुळे मेंदूशी संबंधित आजार (सेरेब्रोव्हस्कुलर डिसीज, किंवा व्हॅस्कुलर ब्रेन डिसीज) दूर राहतात.
मासे खाल्ल्याने हृदयरोग, स्ट्रोक आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. तसेच मासे रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइडची पातळीही कमी करू शकतात. मासे अल्झायमर रोगासह डिमेंशियाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
मासे दमा, मधुमेह आणि दाहक परिस्थितींमध्ये मदत करू शकतात.