ठाणे, पालघर, रायगड जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर; हरकतींसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत; ३ नोव्हेंबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध

तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मतदारसंघनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. ठाणे, पालघर, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणावरील सूचना हरकतींसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून ३ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत संपली. तेव्हापासून जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नसल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. आता मात्र आरक्षण सोडत निघाल्याने मिनी विधानसभेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आरक्षण सोडतीमुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवार आता आरक्षणानुसार रणनिती आखण्यास सज्ज झाले आहेत. तिन्ही जिल्ह्यांतील राजकीय कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. आरक्षण सोडतीनंतर आता निवडणुकीच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत १४ ओबीसी सदस्य
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्ष-तेखाली ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी रुपाली भाल के, तहसीलदार सचिन चौधर, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सहा तालुका निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे: शहापूर शिरोळ : अनुसूचित जमाती (स्त्री), कसारा बु. अनुसूचित जमाती, वाशाळा बु.: अनुसूचित जमाती, कोठारी: अनुसूचित जमाती (स्त्री), बिरवाडी अनुसूचित जमाती (स्त्री), चरपोली : सर्वसाधारण, अघई अनुसूचित जमाती (स्त्री), वासिंद : अनुसूचित जाती, खातिवली सर्वसाधारण, आसनगाव : ओबीसी, गोठेघर : सर्वसाधारण, नडगाव ओबीसी, अस्नोली : ओबीसी, किन्हवली: सर्वसाधारण (स्त्री), सावरोली सो. अनुसूचित जमाती. मुरबाड माळ अनुसूचित जमाती (स्त्री), वैशाखरे : अनुसूचित जमाती (स्त्री), धसई सर्वसाधारण, सरळगाव : सर्वसाधारण (स्त्री), कुडवली: ओबीसी, देवगाव सर्वसाधारण (स्त्री), शिरवली: अनुसूचित जमाती, डोंगरन्हावे: ओबीसी. कल्याण – खडवली: सर्वसाधारण (स्त्री), घोटसई: सर्वसाधारण, कांबा : सर्वसाधारण, म्हारळ अनुसूचित जमाती (स्त्री), रायते : सर्वसाधारण (स्त्री). भिवंडी गणेशपुरी अनुसूचित जमाती (स्त्री), अंबाडी सर्वसाधारण (स्त्री), मोहंडूळ

ठाणे जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण
शहापूर : अनुसूचित जमाती (महिला), मुरबाड : सर्वसाधारण, कल्याण : नागरिकांचा मागास प्रवर्ग, भिवंडी: अनुसूचित जमाती (महिला), अंबरनाथ : सर्वसाधारण (महिला). : अनुसूचित जमाती, बोरिवलीतर्फे राहूर ओबीसी (स्त्री), पडघा ओबीसी (स्त्री), लोनाड सर्वसाधारण, कवाड खु. ओबीसी, दाभाड ओबीसी, महापोली सर्वसाधारण, शेलार : ओबीसी, खोणी: सर्वसाधारण (स्त्री), काटई ओबीसी (स्त्री), कांबे अनुसूचित जमाती, खारबाव सर्वसाधारण, कारिवली: सर्वसाधारण (स्त्री), राहनाळ : सर्वसाधारण (स्त्री), काल्हेर सर्वसाधारण (स्त्री), पूर्णा ओबीसी (स्त्री), अंजूर : सर्वसाधारण, रांजणोली सर्वसाधारण, कोन सर्वसाधारण (स्त्री) अंबरनाथ चरगाव ओबीसी, नेवाळी ओबीसी (स्त्री), वाडी: सर्वसाधारण, वांगणी अनुसूचित जाती (स्त्री).

पालघर जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण
पालघर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, डहाणू अनुसूचित जमाती महिला, तलासरी अनु सूचित जमाती, विक्रमगड अनुसूचित जमाती महिला, वाडा अनुसूचित जमाती, जव्हार -अनुसूचित जमाती, मोखाडा अनुसूचित जमाती महिला, वसई अनुसूचित जमाती महिला.

पालघर जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी ३७ जागा
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रणजित देसाई यांच्या उपस्थितीत काढली. ३७ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

गटनिहाय आरक्षण : अनुसूचित जाती-पास्थळ, अनुसूचित जमाती सर्वसाधारण जव्हार विनवळ, डहाणू आंबेसरी, तलासरी उपलाट, डहाणू चारोटी, डहाणू कैनाड, डहाणू दाभोण, तलासरी वडवली, विक्रमगड कुझे, डहाणू आशागड, विक्रमगड मलवाडा, पालघर हाळोली, डहाणू बोर्डी, पालघर धुकटण, वसई भाताने, वाडा गालतरे, तलासरी वसा. अनुसूचित जमाती महिला – जव्हार वावर, जव्हार झाप, जव्हार ग्रामीण, विक्रमगड दादडे, डहाणू मोडगाव, विक्रमगड तलवाडा, तलासरी सूत्रकार चळणी, पालघर बन्हाणपूर, मोखाडा खोडाळा, तलासरी डोंगारी, डहाणू आंबोली, पालघर शिगाव, मोखाडा आसे, मोखाडा पोशेरा, मोखाडा आलोंढे, भिसेनगर, वाडा गांधारे, वाडा खनिवली. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण सातपाटी, कुडूस, मनोर, तारापूर, बोईसर वंजारवाडा, चंद्रपाडा, चिंचणी. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दांडी, एडवण, खैरापाडा, केळवा, उंबरपाडा नंदाडे, बोईसर, माहीम, अर्नाळा किल्ला. सर्वसाधारण प्रवर्ग कळंब, धाकटी डहाणू, खुपरी. सर्वसाधारण महिला-सरावली.

रायगड झेडपीत ३३ जागा सर्वसाधारण
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे गट आरक्षण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत कियारा शिंदे व मयुरा महाडिक या मुलींच्या हस्ते आरक्षण सोडत काढली. ५९ पैकी ३३ जागा सर्वसाधारण आहेत. जिल्हा परिषद आरक्षण अनुसूचित जाती (महिला): पालीदेवद, अनुसूचित जाती (खुला) गोरेगाव, अनुसूचित जमाती (महिला) कशेळे, चौक, जिते, बोलीं पंचतन, मोठे वेणगाव. अनुसूचित जमाती (खुला) महालमिया डोंगर, कळंब, राबगाव, नेरे. इतर मागास प्रवर्ग (महिला) राहटवड, चेंढरे, खरवली, वावंजे, आंबेवाडी, वावेघर, घोसाळे, बिरवाडी. इतर मागास प्रवर्ग (खुला): केळवणे, दासगाव, कावीर, जासई, चिरनेर, कापडे बुद्रुक, कडाव. सर्वसाधारण (महिला): गव्हाण, माणतर्फे वरेडी, आचकरगाव, चांजे, तळाशेत, शिहू, जांभूळपाडा, नवघर, चरई खुर्द, नेरळ, कोल्लई, पळस्पे, आंबेपूर, थळ, वडघर, आराठी. सर्वसाधारण (खुला): वासांबे, सावरोळी, दादर, वडखळ, शहापूर, आवास, चौल, राजपुरी, नागोठणे, भुवनेश्वर, निजामपूर, मोर्चा, पाभरे, पांगळोली, नाडगावतर्फे बिरवाडी, करंजाडी, लोहारे.

रायगड जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण
म्हसळा – अनुसूचित जाती (महिला), तळा अनुसूचित जमाती (खुला), श्रीवर्धन – अनुसूचित जमाती (महिला), माणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला), अलिबाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), कर्जत नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला), महाड नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पनवेल सर्वसाधारण (महिला), खालापूर सर्वसाधारण, उरण सर्वसाधारण, मुरुड सर्वसाधारण, सुधागड सर्वसाधारण (महिला), पोलादपूर सर्वसाधारण, पेण- सर्वसाधारण (महिला), रोहा सर्वसाधारण (महिला)

कही खुशी कही गम
जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मनाप्रमाणे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांचे चेहरे खुलले. तर अपेक्षित आरक्षण न पडल्याने काहींचा हिरमोड झाला. संधी हुकल्याने पुन्हा पाच वर्षे थांबावे लागेल याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर होती.