
रेकॉर्डवरचा आरोपी असलेला सलमान सलीम खान (28) याच्यावर वडाळा टी.टी. पोलिसांनी तडिपारीची कारवाई केली आहे. उपायुक्त रागसुधा आर यांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
दुचाकी चोर गजाआड
पार्क केलेल्या दुचाकी शिताफीने चोरून नेणाऱ्या एका अट्टल चोरास वडाळा टी.टी. पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपीने वडाळा टी.टी. व अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
मिठाईच्या दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी
मिठाईच्या दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना कुरार पोलिसांनी अटक केली. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हंसराज चौधरी याचे मालाड पूर्व परिसरात मिठाईचे दुकान आहे. 5 ऑक्टोबरच्या रात्री दुकानात चोरी केली. चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास करून रिहान शेख, सनी सिंग आणि अविनाश शर्मा या तिघांना अटक केली. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध काही गुन्हय़ांची नोंद आहे.


























































