
वैद्यकीय अभ्यासक्रमाची तिसरी फेरी लांबणीवर पडली असताना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशात 2 हजार 650 नव्या जागा वाढवल्या आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये 150 नव्या जागांना मान्यता मिळाली आहे. या जागांचा तिसऱ्या फेरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अधिक संधी उपलब्ध होणार आहे. नव्याने मान्यता मिळालेल्या या जागांमुळे देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या 1 लाख 26 हजार 725 इतकी झाली आहे.