निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळले, सर्वोच्च न्यायालयात 11 नोव्हेंबरला सुनावणी

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात 11 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांचे नाव वगळणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, 2023 या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला विविध याचिकांमधून आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, 2023 या नवीन कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांचे स्थान हटवण्यात आले आहे. हे प्रकरण मंगळवारी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्यावर वेळेअभावी सुनावणी होऊ न शकल्याने प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला निश्चित केली.