हे करून पहा – घरातील आरसा चकचकीत करण्यासाठी

घरातील आरसा नेहमी चकचकीत असावा असे वाटते, परंतु बऱ्याचदा या आरशावर धूळ साचलेली असते. चेहरा व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे सर्वात आधी आरशावरील धूळ काढण्यासाठी एक स्वच्छ आणि कोरडा कापड घ्या. हलक्या हाताने धूळ स्वच्छ करा.

अर्धा लिंबू आणि थोडे मीठ घेऊन त्याचे द्रावण तयार करा. हे द्रावण स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार केलेले द्रावण आरशावर हलकेच फवारा. आरशावर जास्त फवारा मारू नका. स्वच्छ मायक्रोफायबर कापडाने आरसा गोलाकार पद्धतीने हळुवारपणे पुसा. यामुळे डाग निघून जातील आणि आरसा चकचकीत दिसेल. स्वच्छ आणि कोरडय़ा मायक्रोफायबर कापडाने आरसा पुन्हा एकदा पुसून घ्या.