ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी ठाणेकर नागरिकांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिका लुटून खाल्याचा आरोप केला.



























































