
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.नुकतेच राहुल गांधी जुन्या दिल्लीच्या एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानावर पोहोचले. तिथे त्यांनी इमरती आणि बेसनचे लाडूही बनवले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
कधी दिल्लीच्या प्रसिद्ध चाटच्या दुकानात स्वाद घेताना तर कधी लंडनच्या प्रसिद्ध कॅफेत कॉफी घेताना दिसतात. त्यांची खवय्येगिरी सर्वांनाच प्रचिती आहे. आता देशभरात दिवाळीचा सण सुरु आहे. अशातच राहुल गांधी दिवाळी निमित्त ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानावर पोहोचले. यावेळी त्यांनी स्वत: मिठाई आणि बेसनचे लाडू बनवण्याचा अनुभव घेतला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका कढईच काविलता फिरवून मिठाई बनवताना दिसत आहेत तर त्यांनी जिलेभीही काढली.
पुरानी दिल्ली की मशहूर और ऐतिहासिक घंटेवाला मिठाइयों की दुकान पर इमरती और बेसन के लड्डू बनाने में हाथ आज़माया।
सदियों पुरानी इस प्रतिष्ठित दुकान की मिठास आज भी वही है – ख़ालिस, पारंपरिक और दिल को छू लेने वाली।
दीपावली की असली मिठास सिर्फ़ थाली में नहीं, बल्कि रिश्तों और समाज… pic.twitter.com/bVWwa2aetJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 20, 2025
हा व्हिडीओ सोशल मीडिया साईट एक्सवर राहुल गांधी यांनी शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहीले की, दिल्लीचे प्रसिद्ध घंटेवाला मिठाईवालेदुकानावर बेसनचे लाडू बनवले. जुन्या असलेल्या या प्रसिद्ध दुकानाची चव आजही तशीच आहे. तोच पारंपारिकपणा आणि जीभेवर रेंगाळणारी चव आहे. दिपावलीचा खरा गोडवा थाळीत नव्हे तर नात्यांमध्ये आणि समाजामध्येही असतात. त्यांनी पुढे लोकांना विचारले तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करतात आणि कशी खास बनवता? असा प्रश्न विचारला आहे.