
डिलिव्हरी अॅप झोमॅटो आणि ब्लिंकिटच्या मालकीची कंपनी इटर्नलला उत्तर प्रदेशच्या जीएसटी विभागाकडून 128 कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली आहे. ही नोटीस लखनऊच्या उपायुक्ताने जारी केली आहे. एप्रिल 2023 ते मार्च 2024 यादरम्यान आऊटपूट टॅक्सचे कमी पे आणि इनपूट टॅक्स व्रेडिट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, आदेशात केवळ 64.17 कोटी रुपयांच्या जीएसटीची मागणीसोबत तितक्याच किमतीचे व्याज व दंड लावले आहे.