
भारतीय जाहिरात जगताला मोठा धक्का बसला आहे. जाहिरात गुरू म्हणून ओळखले जाणारे पीयूष पांडे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांनी “अबकी बार मोदी सरकार” आणि “थंडा मतलब कोका कोला” यासारख्या अनेक प्रसिद्ध जाहिराती लिहिल्या. त्यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे झाला. तथापि, मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्यासह चित्रपट उद्योगातील अनेक प्रमुख व्यक्तींनी पीयूष पांडे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. हंसल मेहता यांनी इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, “फेविकॉलचे बंधन तुटले आहे. आज, जाहिरात जगताने एक अवलिया गमावला आहे.”



























































