पश्चिम रेल्वेने भंगारातून कमावले 302 कोटी

प्रवासी सेवा तसेच कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबवणा ऱ्या पश्चिम रेल्वे प्रशासनाला ‘मिशन झीरो क्रॅप’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम चांगलाच फायदेशीर ठरला आहे. पश्चिम रेल्वेने ‘मिशन झीरो क्रॅप’ उपक्रमांतर्गत सात महिन्यांत तब्बल 302 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न कमावले आहे. सर्व रेल्वे आस्थापना आणि युनिट्स भंगारमुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्ष 2025-26 मधील सात महिन्यांत पश्चिम रेल्वेने ‘मिशन झीरो क्रॅप’ उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत 302 कोटी रुपयांपेक्षा जास्त भंगार विक्रीचे उद्दिष्ट गाठता आले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी ही माहिती दिली.