
जम्मू-काश्मीरमधील नार्को-टेरर मॉडयूलचा म्होरक्या मोहम्मद अशरफ उर्फ आसिफ याला आज मुंबईतील विमानतळावर अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीरच्या स्टेट इन्व्हेस्टिगेटीव्ह एजेंसीने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा पुंछ जिह्यातील डेगवार-तेरावान या गावचा रहिवासी आहे. तो 2023 पासून फरार होता. तो सौदी अरब येथून सूत्रे हलवायचा. तो पाकिस्तानातील हँडलर्स आणि जम्मू-काश्मीरतील नार्को-टेरर मॉडयूल चालविणाऱयांमधील महत्त्वाचा दुवा होता. त्याच्याविरुद्ध 2023 मध्ये लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 8 आरोपी होते. त्यापैकी 2 फरार होते. त्यापैकी लकीत अहमद याला गेल्या वर्षी अहमदाबाद येथे अटक करण्यात आली होती.


























































