
गाझियाबादमध्ये एनमएच 9 वर एक दुर्देवी अपघात घडल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात राठी मिल कठजवळ दिल्लीच्या गाझियाबाद लेनवर झाला आहे.
एकाच बाईकवरुन तिघंजण येत होते. भरधाव बाईर राठी मिल कटजवळ अचानक पुढे जाणाऱ्या कारला धडकली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये आर्यन (16), भावुक तोमर (15) आणि मयंक (11) अशी मुलांची नावे आहेत. हे क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस स्टेशन परिसरातील शांती नगर स्ट्रीट क्रमांक 6 येथील रहिवासी आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

























































