
निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहाराकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आपला आहार जितका समतोल असेल तितकेच आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आजही आपल्याकडे जेवताना काही पदार्थ हे आपल्या ताटात असणे हे खूप गरजेचे आहे. त्यापैकी एक म्हणजे दही. दह्याचा आपल्या आहारातील समावेश हा खूप महत्त्वाचा मानला जातो. दही आहारात समाविष्ट केल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये दही जेवणात नसेल तर घासही जात नाही.
दही रोजच्या आहारात असणे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. दही आपल्या शरीरामध्ये अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामुळेच झोप न येण्याची तक्रारही दूर होते. दही आहारात आपण अनेक प्रकारे घेऊ शकतो. आपण नुसते दही खाऊ शकतो. किंवा दह्यापासून कढी, ताक असे विविध प्रकारही आपण करु शकतो. यामुळे दही आपल्या पोटात जाण्यासही मदत होते. दही वापरुन आपण अनेक प्रकारच्या कोशींबिरी करु शकतो. तसेच नुसते साखर घालूनही दही खाण्याची एक वेगळीच मजा आहे.
दही पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. दह्यामुळे आपल्या तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होते.
दह्यामुळेच आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. दुधापासून तयार होणारे अनेक पदार्थ आहे. त्यातले दही हे आपल्या घरात रोज असते. त्यामुळे घरात सहज उपलब्ध असलेला हा पदार्थ
आपण आहारातही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. दह्यापासून आपण अनेक पदार्थ करून आपल्या जेवणाची लज्जत वाढवू शकतो.
दह्यामध्ये बी-6 आणि बी-12 यांचे प्रमाण खूप असते. यामुळेच आपल्याला गॅस आणि अपचन या समस्यांपासून सुटका होते.
दही खाण्यासोबत केसांनाही अतिशय पोषक आहे. केसांना दही लावल्यामुळे एक अनोखी चकाकी केसांना प्राप्त होते. म्हणूनच अनेकदा मेहंदी भिजवताना ती दह्यामध्ये भिजवली जाते. केसांना दही लावल्यामुळे कोंडा नष्ट होण्यास मदत होते. तसेच केसांना उत्तम चकाकीही येते. दही लावल्यामुळे केसही मुलायम होतात.
आपल्या आहारामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी राहण्याचे लक्षण आहे. दही म्हणजे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र.




























































