तुम्हाला लाज वाटत नाही का! सनी देओल भडकला

suuny deol

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीतील चढउतारामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत असताना पापाराझी त्यांच्या घराबाहेर दिवसरात्र कॅमेरे लावून आहेत. आज त्यांना घराबाहेर पाहून धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल आज भडकला. हात जोडून तो म्हणाला, ‘तुमच्याही घरी आई-वडील आहेत, मुलंबाळं आहेत. मूर्खासारखे व्हिडीओ का पोस्ट करत आहात? तुम्हाला जराही लाज वाटत नाही का,’ असा संताप त्याने व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.