
दुकानामध्ये चोऱ्या करणाऱ्या शातीर चोरटय़ाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अझान खान ऊर्फ अभयराज मोतीलाल सरोज ऊर्फ मोनू असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात 100हून अधिक गुन्हे नोंद आहेत.
अझान हा फक्त दुकानातून रोख रक्कम चोरतो. चोरीच्या पैशातून तो ड्रग खरेदी करतो. त्या ड्रगची नशा एक-दोन दिवस राहिल्यानंतर तो पुन्हा चोऱ्या करण्यासाठी बाहेर पडतो, अशी त्याची गुह्याची पद्धत आहे. त्याच्या अटकेने 10 गुह्यांची उकल करण्यात कांदिवली पोलिसांना यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी कांदिवली येथील एका दुकानात घरपह्डी झाली होती. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करत त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अझान हा पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मार्वे येथील समशानभूमी सिग्नल येथून जात असायचा. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. तो एका दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला रंगेहाथ पोलिसांनी पकडले.

























































