हार्बर, ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांचे आज हाल होणार

मध्य रेल्वेने देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या अवधीत धिम्या मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहारपर्यंत सर्व लोकल वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱया सेवा रद्द राहतील.