
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाच उमेदवारींनी आपले अर्ज सादर केले.
आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.प्रभाग क्र.३ ब मधून प्रसाद सावंत, प्रभाग क्र. १५ अ- राजश्री शिवलकर, प्रभाग क्र.१५ ब मधून अमित विलणकर, प्रभाग क्र.८ ब मधून साजीदखान पावसकर, प्रभाग क्र.९ ब मधून नाझनीन हकीम यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे उपस्थित होते.



























































