आमच्या येथे निवडणूक कृपेवरून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा

राज्यात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राज्य सरकारकडून विविध ‘लाभा’च्या योजना जाहीर करून कोटय़वधी रुपयांची खैरात केली जात आहे. आता तर नगर परिषद, नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच ‘पीएम – किसान सन्मान योजनेंतर्गत’ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने निधी वितरणासाठी निवडणुकीचाच ‘मुहूर्त’ का साधला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी ‘लाडकी बहीण’ योजना आणून महिलांच्या खात्यावर प्रतिमहा दीड हजार रुपये जमा केले. आता ऐन निवडणुकीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱयांना थेट लाभ दिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • महाराष्ट्रात 90 लाख 41 हजार 241 शेतकऱयांना या योजनेचा फायदा होणार आहे. यामध्ये 1808 कोटी 25 लाखांची मदत दिली जाणार आहे.
  • ‘पीए किसान सन्मान’ योजनेनुसार शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत दोन हजारांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा करून दिली जाते. यानुसार आज योजनेतील 21 वा हफ्ता शेतकऱयांच्या खात्यावर थेट जमा करण्यास सुरुवात करण्यात आली.