
पुणे माणगांव मार्गावर ताम्हिणी घाटात एक कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या गाडीतील काही प्रवाशांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू आहे.
एक थार गाडी ताम्हिणी घाटातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातानंतर ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहिम सुरू केली. घटनास्थळावरून पोलिसांना तीन मृतदेह सापडले आहेत. माणगाव पोलिसांचे बचाव पथक इतर प्रवाशांचा शोध घेत आहे.


























































