नवी मुंबईतील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नवी मुंबईतील बेलापूर विधानसभाकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालील प्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत.

उपजिल्हा संघटक प्रणाली कदम (वाशी), रंजना खैरनार (सीबीडी), वंदना गोडसे (सानपाडा), शहर संघटक – स्मिता ढमामे (बेलापूर), उपशहर संघटक – विणा सालेकर (नेरुळ), विद्या खंबाळकर (नेरुळ), दीपा कडू (नेरुळ प.), बबिता आहेर (नेरुळ), संगीता शिंगाडे (जुईनगर), विभाग संघटक – रोहिणी मांढरे (नेरुळ), प्रिया चव्हाण (नेरुळ प.), मंगल कारकीले (नेरुळ प.), उपविभाग संघटक- सीमा सकपाळ (नेरुळ प.), दीप्ती आईर (नेरुळ प.), वैशाली भालेकर (नेरुळ प.), शाखा संघटक प्राची सामंत (नेरुळ प.), अनिता गवारे (नेरुळ प.), अश्विनी पुकारे (नेरुळ प.), सुषमा पाटोळे (वाशी), गार्गी नाईक (नेरुळ प.) आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.