
गुजरातमधील सुरतमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुरतमधील एका कॅफेच्या नवव्या मजल्यावरून 28 वर्षीय महिला डॉक्टरने जीवन संपवले. राधिका कोटडिया असे मयत डॉक्टरचे नाव असून ती फिजीओथेरपिस्ट म्हणून काम करत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून राधिकाचा मोबाईल फोन, हँडबॅग आणि इतर वैयक्तिक कागदपत्रे जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधिका सूरतमधील सरथाना येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या नवव्या मजल्यावरील चाय पार्टनर कॅफेत रात्री 8 च्या सुमारास गेली. तेथे तिने चहा मागवला. त्यानंतर 20 मिनिटे होणाऱ्या नवऱ्याशी गप्पा मारल्या. मग अचानक रेलिंगजवळ गेली आणि खाली उडी घेतली. कॅफेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
राधिका मूळची जामनगर येथील रहिवासी आहे. तिचे वडील डायमंड कंपनीत काम करतात. दोन महिन्यांनी तिचे लग्न होणार होते. तत्पूर्वीच तिने टोकाचे पाऊल उचलले. राधिकाचा तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी वाद झाला होता. याच कारणामुळे मानसिक तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी राधिकाचा मोबाईल चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग्ज मिळवल्या आहेत. पोलीस राधिकाच्या भावी पतीचीही चौकशी करत आहेत.
सूरतमधील सरथाना येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या ९ व्या मजल्यावरील चाय पार्टनर कॅफेवरून उडी मारून आत्महत्या केली. डॉक्टरचे लग्न दोन महिन्यांत होणार होते. डॉ. राधिका तिच्या मंगेतरासोबत चाय पार्टनर कॅफेला अनेकदा भेट देत असे आणि त्याच कॅफेवरून उडी मारून आत्महत्या करत असे.
























































