
नोएडामधील एका महिलेनं दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तिच्या लहान मुलाची तब्येत किती बिघडली याची हकिगत सांगत सोशल मीडियावर वेदना व्यक्त केल्या. साक्षी पाहवा नावाच्या या महिलेनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मुलाची हॉस्पिटलमधील अवस्था दाखवली आणि वाढत्या प्रदूषणावर संताप व्यक्त केला.
साक्षी यांनी म्हटलं की, लिहिलं की ती दोन वर्षांपूर्वी कुटुंबासह दिल्ली-एनसीआरमध्ये राहायला आली. त्यानंतरपासूनच तिच्या मुलाला सतत सर्दी-खोकला, एलर्जी आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. अनेक उपचार करून पाहिले, पण काहीच फायदा झाला नाही. प्रदूषण दिवसेंदिवस वाढत गेलं आणि मुलाची तब्येत अधिकच ढासळत गेली.
तिनं पोस्टमध्ये लिहिलं, माता-पिता म्हणून मुलाला रडताना हॉस्पिटलमध्ये पाहणं अतिशय वेदनादायक आहे. आम्ही टॅक्स देतो आणि बदल्यात आमच्या मुलांना हेच मिळतं. आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. दिल्ली-एनसीआरचं प्रदूषण फक्त हवेलाच नाही तर माझ्या मुलांना सर्जरीपर्यंत आणलं. दोन वर्षांपासून सतत सर्दी-खोकला, एलर्जी आणि श्वास घेण्याची समस्या सुरूच आहे. कोणतीही औषधं चालत नाहीत, पण प्रदूषण वाढतच आहे.
ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक लोकांनी तिच्या पोस्टवर चिंता व्यक्त केली. एका यूजरनं सल्ला दिला, राहण्याची जागा बदला. औषधं आणि त्रास सहन करण्यापेक्षा स्वच्छ हवेच्या शहरात जाणं चांगलं. दुसऱ्यानं लिहिलं, हे खूप भयावह आहे. लोक आजारी पडत आहेत आणि सरकार परिस्थिती लपवत आहे. तिसऱ्या यूजरनं म्हटलं, ज्यांना वाटतं की प्रदूषणामुळे नाही, त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहावं. बहुतेक मुलं आणि ज्येष्ठ नागरिक खराब हवेमुळे आजारी पडत आहेत.
दरम्यान, बुधवारी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 337 नोंदवला गेला, जो अतिशय खराब श्रेणीत येतो. शहरातील 39 एअर मॉनिटरिंग स्टेशनपैकी 34 मध्ये अतिशय खराब तर 5 ठिकाणी खराब हवा नोंदली गेली.
View this post on Instagram



























































