
देशाच्या कानाकोपऱ्याच दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. दोन आणि तीन वर्षांच्या मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांवर अत्याचार केला जात आहे. ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात केला जात असल्यांच अनेक प्रकरणांमध्ये सिद्ध झाले आहे. आता पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार घडला असून मित्राने आणि त्याच्या वडिलांनीच तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याचं उघडकीस आले आहे. जवळपास 13 दिवस तरुणीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तर प्रदेशाील हापूर जिल्ह्यातीर हापूर शहरामध्ये समाजमन सुन्न करणारी ही घटना घडली आहे. TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, 14 वर्षीय तरुणीला 13 नोव्हेंबर रोजी मित्राच्या घरी आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी तिला कोल्ड्रिंक देण्यात आलं. कोल्ड्रिंक पिल्यानंतर हळुहळु तिची शुद्ध हरवली. जेव्हा ती अर्धबेशुद्ध झाली, तेव्हा तिला जाणवलं की मित्राचे वडील आणि अन्य दोन व्यक्ती तिच्यावर लैगिंक अत्याचार करत आहेत. तिला घरात डांबून ठेवण्यात आलं आणि तिच्यावर आळीपाळीने अनेक वेळा बलात्कार केला. तब्बल 12 दिवसांनी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी घरातून पळून जाण्यात ती यशस्वी ठरली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने 14 नोव्हेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारावर पोलिसांनी BNS कलम ७० (२) (सामूहिक बलात्कार), १२७, १२३, १३७ आणि पोक्सो कायद्याच्या ५/६ कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, पीडितेचा मित्र आणि त्याचे वडील अजूनही फरार आहेत.



























































