डिजिटल सातबाराला मान्यता, अवघ्या 15 रुपयांत डाऊनलोड

तलाठय़ांच्या खाबूगिरीला चाप लावण्यासाठी महसूल विभागाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापुढे ऑनलाइन काढण्यात येणाऱया सातबारावर तलाठय़ाच्या सही शिक्क्याची गरज नसेल. फक्त पंधरा रुपयांमध्ये सातबारा डाऊनलोड करता येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाने यासंदर्भातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले.

असा काढता येईल सातबारा

महाभूमी पोर्टलवर digitalsatbara.mahabhumi.gov.in यावर आता नागरिकांना डिजिटल पेमेंटच्या मदतीने सातबारा डाऊनलोड करता येतील. ते डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करू शकतील. शासकीय कामकाजासाठी हा डिजिटल सातबारा वैध असेल असा आदेश देण्यात आला आहे.